बीड एलसीबीकडून आंतरराज्य सोनसाखळी चोरटे गजाआड

बीड : अर्ध्या महाराष्ट्रासह गोवा राज्यात 27 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद असलेल्या सोनसाखळी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला बीड एलसीबी पथकाने गजाआड केले आहे. या टोळीच्या माध्यमातून बिड जिल्ह्यातील पाच सोनसाखळी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. बीड एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत अब्बास इराणी (रा. आंबेवली, जि. ठाणे, ह.मु. पुणे) व त्याच्या तिघा साथीदारांना गजाआड करण्यात आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तिन राज्यांत या टोळीवर विविध गुन्हे दाखल आहेत. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या तपासाअंती या टोळीचा छडा लागला. 

या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत वेगळ्या स्वरुपाची असल्यामुळे ही टोळी लवकर सापडत नव्हती. सोनसाखळी लांबवल्यानंतर हे गुन्हेगार लागलीच चारचाकी वाहनात लपून बसायचे आणि तेथेच कपडे बदलून घेत होते. दुचाकीवरील चारचाकीत व चारचाकीतील दुचाकीवर बसून प्रवास करुन ते पसार व्हायचे. त्यामुळे गुन्हा करतांना असलेला त्यांचा पेहराव आणि वाहन बदलून जात होते. बीड, परभणी, नांदेड, सोलापूर, पुणे, ठाणे, उल्हासनगर, कोल्हापूर, पणजी आदी ठिकाणी या टोळीने गुन्हे केले आहेत. अटकेतील अब्बास इराणी या मुख्य आरोपीकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एएसपी सुनील लांजेवार, पो.नि. सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक  भगतसिंह दुल्लत, मनोज वाघ, विकास वाघमारे, राहुल शिंदे, प्रसाद कदम, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, विकी सुरवसे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here