औरंगाबादला वरवंटा घालून पत्नीची हत्या

औरंगाबाद : चारित्र्याच्या संशयातून वरवंटा घालून पत्नीची हत्या करणा-या फरार आरोपीस जिन्सी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे. शेख खलील शेख इस्माईल (40) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. दुसरी पत्नी अंजूम (32) हिची हत्या केल्याच्या आरोपाखाली खलील यास जिन्सी पोलिसांच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे.

रविवार 27 मार्चच्या सकाळी दहा वाजेच्या सुमारास चारित्र्याच्या संशयातून पती पत्नीत वाद झाला होता. अंजुमने दुसरीकडे राहण्यास खलील यास विरोध दर्शवला. वाद विकोपाला गेल्यानंतर खलीलने तिच्या डोक्यात दगडी वरवंटा मारला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. ती मरण पावल्याचे समजून खलील याने घटनास्थळावरुन पलायन केले. परिसरातील लोकांनी तिला दवाखान्यात दाखल केले. मृत्युशी झुंज देत ती रात्री साडेनऊ वाजता घाटी रुग्णालयात मरण पावली. मयत अंजुमचा भाऊ रहीम शेख याने दिलेल्या फिर्यादीनुसार रहिम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here