डॉलरच्या नकली नोटेच्या बदल्यात लाखोची फसवणूक

नांदेड : एक बिलीयन डॉलरच्या नकली नोटेच्या बदल्यात भारतीय चलन देण्याचे आमीष दाखवत लाखो रुपयात फसवणूक करणा-या तिघांना नांदेड येथे एलसीबी पथकाने अटक केली आहे. अटकेतील त्रिकुटांचे दोघे साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. अटकेतील तेलंगणा येथील टोळीकडून एक बिलीयन डॉलरची नकली नोट (असली नोटेचे भारतीय मुल्य रु. साडेसातशे कोटी), कार आणि रोख असा एकुण 11 लाख 52 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

एक बिलियन डॉलर मुल्याची नकली नोट लोकांना खरी भासवून दाखवायची आणि त्या बदल्यात भारतीय मुल्य मिळाल्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत पळून जाण्याची या गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पद्धत आहे. महेश इल्लय्या वेल्लुटला, नंदकिशोर गालरेड्डी देवारम व आनंदराव आयात्रा गुंजी अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. दशरथ व त्याचा मित्र असे दोघे जण फरार होण्यात यशस्वी झाले असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वजिराबाद पोलिस स्टेशनला या टोळीविरोधात विविध कलमानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  पुढील तपास पो.नि. जगदीश भंडरवार करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here