खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस एलसीबी पथकाने केली अटक

जळगाव : प्राणघातक हल्ल्याच्या घटनेत नंतर खूनाचे वाढीव कलम लागलेल्या गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला या घटनेप्रकरणी 18 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय उर्फ गम्या नारायण राठोड (30) रा.शंकरआप्पा नगर पिंप्राळा जळगाव असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. सामान्य रुग्णालयाच्या गेट क्रमांक एकच्या समोर सदर प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती. या घटनेत अरुण भिमराव गोसावी आणि सुरज विजय ओतारी हे जखमी झाले होते. उपचारादरम्यान सुरज ओतारी याचे निधन झाले.

अरुण गोसावी याचा मित्र सामान्य रुग्णालयात दाखल होता. त्याची भेट घेण्यासाठी अरुण गोसावी आणि सुरज ओतारी असे दोघे जण आले होते. परत जात असतांना वाटेत प्रवेशद्वाराजवळ भुषण माळी उर्फ भाचा, सचिन उर्फ टिचकुले कैलास चौधरी, आकाश ठाकुर उर्फ खंड्या व इतर चार ते पाच आरोपींनी मिळून दोघांची वाट अडवत अश्लिल शिवीगाळ करत तुम्ही इथे कशाला आले अशी विचारणा करत हल्ला चढवला होता. यावेळी सुरज ओतारी याच्या खांद्यावर, डाव्या कमरेवर, मांडीवर तसेच डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान सुरज ओतारी याचे निधन झाल्याने याप्रकरणी खूनाचे कलम वाढवण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, पोलिस नाईक अविनाश देवरे, राहुल पाटील, प्रितम पाटील आदींनी फरार अक्षय उर्फ गम्या राठोड यास अटक केली असून या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्यातील काही आरोपी जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे स.पो.नि.किशोर पवार यांच्यासह कर्मचा-यांनी तर काही आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणले होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here