चोरीच्या दोन मोटार सायकलसह चोरट्यास अटक

जळगाव : अट्टल गुन्हेगारी वृत्तीच्या मोटार सायकल चोरट्यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत. रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे रा. एमडीएस कॉलनी जळगाव असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून मुद्देमाल देखील हस्तगत झाला आहे.

दिलीप शिवदास गोपाळ रा. कुसुंबा यांच्या मोटार सायकल चोरीप्रकरणी 19 मार्च 2022 रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीच्या तपासादरम्यान पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे याने मोटार सायकली चोरी केल्याची माहिती पो.नि.अरुण धनवडे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. विकास सातदिवे, गणेश शिरसाळे, योगेश बारी, पो.कॉ. गोविंदा पाटील, रविंद्र चौधरी आदींनी त्याला सापळा रचून रामेश्वर कॉलनी परिसरातून अटक केली. त्याने दिलेल्या कबुलीतून मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून त्याने दोन मोटार सायकली काढून दिल्या आहेत. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला शरीराविरुध्द आणि मालाविरुध्द बरेच गुन्हे दाखल आहेत. रीतेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे याची रामेश्वर कॉलनीतील रहिवाशांमधे बरीच दहशत असुन तो आडदांड व खुनशी वृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला एकुण तेरा, जिल्हापेठ पोलिस स्टेशन व रामानंद नगर पोलिस स्टेशनला प्रत्येकी एक असे एकुण पंधरा गुन्हे दाखल आहेत. सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंता, पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here