लग्नाच्या पाचव्या दिवशीच नववधू दागिन्यांसह पसार

खुलताबाद : लग्नानंतर जोडीने फिरायला गेल्यानंतर नवरदेवाच्या हातावर तुरी देत नववधूने अंगावरील दागिन्यांसह पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. दौलताबाद किल्यावर नवविवाहीत जोडी फिरायला गेल्यानंतर पत्नीने चलाखीने पतीला किल्ला बघण्यासाठी तिकीटे काढण्यास रवाना केले. मी तोपर्यंत काहीतरी खाद्यपदार्थ घेऊन येते असे म्हणत पतीची पाठ फिरताच नववधूने धुम ठोकत गायब होण्याचा प्रकार केला. 1 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी दौलताबाद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील प्रकाश लाटे यांचा मुलगा राजेश प्रकाश लाटे (26) याचा 26 मार्च रोजी शुभांगी प्रभाकर शिंदे या तरुणीसोबत मावसाळा येथे विवाह झाला. लग्नानंतर तीन दिवसांनी सत्यनारायण झाल्यानंतर पाचव्या दिवशी दोघे पती पत्नी दौलताबाद किल्ला बघण्यासाठी गेले. त्याचवेळी नववधून आपली करामत दाखवत पलायन केले. सदर सोयरीक जुळवण्याकामी दलालांनी 1 लाख 41 हजार रुपयात नवविवाहीत वरास गंडवले होते. पैसेही गेले आणि नववधूही गेली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here