फसवणूकीच्या आरोपाखाली रा.कॉ.च्या महिला पदाधिका-यास अटक

jain-advt

अकोला :  कच्चा माल देऊन रोजगार निर्मिती करण्याच्या नावाखाली दिड हजार महिलांची 1 कोटी 32 लाख रुपयात फसवणूक केल्याच्या आरोपाखाली रा.कॉ. महिला पदाधिका-यास अटक करण्यात आली आहे. संगिता चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या जिल्हा महासचिवांचे नाव आहे. त्यांना 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

पुणे व सातारा येथील राधाकृष्ण सेल्स कार्पोरेशन महिला स्वयंरोजगार कंपनीचा संचालक अजित हिरवे याने अकोला जिल्ह्यातील रा.कॉ. ओबीसी सेलच्या जिल्हा महासचिव संगीता चव्हाण यांच्या माध्यमातून महिलांची साखळी तयार केली होती. या महिलांना रोजगार देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचा आरोप आहे. या सर्व महिलांकडून सुरुवातीला एका फॅशनेबल बटनामागे 40 पैसे तर एका महिलेने तीन महिला जोडल्यास एका बटनामागे दोन रुपये मोबदला देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या माध्यमातून 1200 महिलांची साखळी तयार करण्यात आली. सुरुवातीच्या कालावधीत दहा ते बारा हजार रुपये महिना मिळत होता. त्यानंतर कच्च्या मालाचा पुरवठा बंद करण्यात आला. तसेच कामाचा मोबदला देखील देण्यात आला नाही. खदान पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here