चारित्र्याच्या संशयातून पाचो-यात पतीची, नांदगावला पत्नीची हत्या

जळगाव/नाशिक : चारित्र्याच्या संशयातून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पत्नीने मुलांच्या मदतीने पतीची तर नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील बाभुळवाडी येथे पतीने पत्नीची हत्या उघडकीस आली आहे. पाचोरा येथील घटनेत चाकूचा तर नांदगाव तालुक्यातील घटनेत पहारीचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही घटनेत चारित्र्याचा संशय हा समान घटक आहे.

पाचोरा शहरात असलेल्या भास्कर नगर परिसरात संजय बंकट खेडकर हे कुलर दुरुस्ती आणि विक्रीचा व्यवसाय करत होते. ते पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असत. शनिवार 9 एप्रिलच्या रात्री नेहमीप्रमाणे पती पत्नीत चारित्र्याच्या संशयातून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे दुस-या दिवशी रविवारच्या सकाळी दोघा मुलांसह त्यांच्या आईने संजय खेडकर यांची चाकूने वार करत हत्या केली. या घटनेत संजय खेडकर हे मृत्युमुखी पडले. नांदगाव तालुक्यातील बाभुळगाव येथील घटनेत चारित्र्याच्या संशयावरुन संजय सोमनाथ दिवे याने पत्नी सुगंधा दिवे हिचा पहारीचे घाव घालत हत्या केली. या हल्ल्यात त्यांची आठ वर्षाची मुलगी ऋतुजा जखमी झाली आहे. या घटनेत हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा स्वरुपाचा गुन्हा नांदगाव पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here