महिलेचा छळ करणा-या जिम प्रशिक्षकाला अटक

पंढरपूर : सरावाच्या नावाखाली महिला व मुलींचा छळ करणा-या जिम ट्रेनरला पोलिसांनी अटक केली आहे. पंढरपूर शहरातील एका नामांकित जीममधे उघडकीस आलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. राजु गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या जीम प्रशिक्षकाचे नाव आहे.

जीममधे प्रवेश घेतलेल्या एका विवाहितेला डाएटबद्दल माहिती देण्यासाठी राजु गायकवाड याने सुरुवातीला तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याने तिच्याशी मोबाईलवर जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरु केला. सदर विवाहितेचा पती कामावर गेल्यावर ती एकटीच जीममधे जात होती. त्या संधीचा फायदा घेत राजु गायकवाड याने तिच्याकडे वाईट नजरेने पाहणे, व्यायामाच्या सूचना देण्याच्या निमीत्ताने तिला स्पर्श करणे असा प्रकार सुरु केला. तिचे सोशल मिडीया मेसेज आणि फोटो पतीला दाखवण्याची त्याने तिला धमकी देण्यास सुरुवात केली. त्याच्या जाचाला कंटाळून अखेर विवाहीतेने पंढरपूर शहर पोलिस स्टेशन गाठले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक देखील करण्यात आली आहे. राजु गायकवाड याने अनेक मुली व महिलांचा छळ केल्याचे उघड होत आहे. महिला व मुलींसोबत चॅटींग केल्याचे प्रकार उघड होत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here