सण उत्सवांच्या बंदोबस्तासाठी पोलिस दल सज्ज – डॉ. मुंढे

जळगाव : उद्यापासून सलग चार दिवस सर्वधर्मियांचे सण – उत्सव साजरे केले जात आहेत. यात 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती,  16  एप्रिल रोजी हनुमान जयंती,  17 एप्रिल रोजी इस्टर संडे असे सण आहेत. या सण – उत्सवांच्या बंदोबस्तासाठी जळगाव पोलिस दल सज्ज असल्याचे पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी म्हटले आहे. पोलिस अधिक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांसोबत संवाद साधतांना डॉ. मुंढे यांनी माहिती दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या निमीत्ताने एकुण 663 मिरवणूकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात 1400 होमगार्ड, पोलिस मुख्यालयातून 8 आरसीपी प्लाटून, 2500 कर्मचारी, 120 पोलिस अधिकारी तैनात राहणार आहेत. रमजाण, गुड फ्रायडे, इस्टर संडे, हनुमान जयंती आदी सण उत्सवांच्या बंदोबस्तकामी जळगाव पोलिस दल सज्ज आहे. सोशल मिडीयावर गैरसमज पसरवणारे असामाजीक घटकांवर सोशल मिडीया सेलची नजर असल्याचे देखील यावेळी बोलतांना डॉ. मुंडे यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारच्या गैरसमजूतीला, अफवांना बळी पडू नये असे आवाहन यावेळी त्यांनी केले. जातीय किनार असलेले मेसेजेस प्रसारीत करणा-या घटकांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे.  जनतेच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका असल्यास ती निरसन करण्यासाठी त्यांनी प्रशासनाच्या समोर यावे. जातीय सलोखा धोक्यात आणणा-या समुहावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सण जयंती उत्सव साजरे करतांना लाऊड स्पिकरच्या आवाजाबाबत डेसीबलची आखून दिलेली मर्यादा मंडळांनी पाळावी अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here