मोबाइल बॅटरी व डिटोनेटरच्या स्फोटात दोघे बालक जखमी

jain-advt

परभणी : जिंतूर येथे मोबाइल बॅटरीला डिटोनेटर जोडल्यानंतर झालेल्या स्फोटात दोघे बालक जखमी झाले आहेत. खेळत असतांना दोघा मुलांनी बॅटरी व डिटोनेटरची जोडणी केल्याने हा स्फोट झाला. दोघे जखमी बालक दवाखान्यात उपचार घेत आहेत.

जिंतूरनजीक जालना रोड परिसरात एका वाशिंग सेंटरजवळ अमन शाहिदखाँ पठाण (13) आणि शेख अस्लम शेख अब्दुल (10) ही दोन्ही मुले खेळत होते. खेळत असतांना त्यांना एका गोदामाजवळ ब्लास्टिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटिनच्या कांड्यांचा डिटोनेटरचा संच सपडला. या डिटोनेटरला दोघा मुलांनी आपल्याकडील मोबाइलची बॅटरी काढून जोडली. डिटोनेटर आणि बॅटरी यांचे संयोजन होताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात अमन शाहिदखाँ पठाण याच्या डाव्या हाताच्या पाचही बोटांसह उजवा डोळा जखमी झाला. शेख अस्लम शेख अब्दुल याच्या डाव्या डोळ्याला मोठ्या प्रमाणात इजा झाली. दोघा बालकांवर उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here