सोळा वर्षापासून फरार कैद्यास एलसीबीने केली अटक

जळगाव : खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा जाहीर झाल्यानंतर पॅरोल रजेवर जेलमधून बाहेर आल्याचा गैरफायदा घेत फरार झालेल्या बंदी कैद्यास एलसीबीच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. भगवान हिरामण सपकाळे (रा. दिनदयाल नगर, जामनेर रोड, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला शिरुर, पुणे येथून अटक करण्यात आली आहे.

सन 1997 मधे भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दाखल खूनाच्या गुन्ह्यात भगवान हिरामन सपकाळे यास अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला दोषी ठरवत सजा सुनावली होती. नाशिक मध्यवर्ती कारागृहात तो शिक्षा भोगत होता. 2 जून 2006 पासून तो पॅरोल रजेवर कारागृहातून बाहेर आला होता. पॅरोल रजेचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर त्याने पुन्हा जेलमधे जाणे क्रमप्राप्त होते. मात्र जेलच्या बाहेर आल्याची संधी साधून तो फरार झाला होता. सोळा वर्षापासून तो फरार होता. फरार झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गु.र.न. 182/2013 भा.द.वि. 224 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला फरार बंदी कैदी म्हणून घोषित करण्यात आले होते.
फरार भगवान सपकाळे हा शिरुर पुणे येथे रहात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पो.ना. रणजित अशोक जाधव, पोना किशोर ममराज राठोड, पो.कॉ. विनोद सुभाष पाटील, चालक पो.कॉ. मुरलीधर सखाराम बारी आदींनी पुणे गाठून त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. सदर बंदी कैदी क्र. 5566 भगवान हिरामण सपकाळे (50) रा. दिनदयाल नगर, भुसावळ यास पुढील तपासकामी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here