मुलीचे परस्पर लग्न केल्याचा जाब विचारणा-या पित्याची हत्या

चिखली : आपल्या मुलीचे लग्न परस्पर लावून दिल्याचा राग आल्याने जाब विचारण्यास गेलेल्या पित्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या घटनेप्रकरणी ज्योती विनोद इंगळे (३५, रा. डोगरशेवली, ह.मु. सावरगाव डुकरे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चिखली पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

ज्योती इंगळे यांचे पती विनोद इंगळे हे नेहमी मद्यपान करुन वाद घालत होते. त्यामुळे त्या त्यांच्या मामाकडे सावरगाव डुकरे येथे मुलाबाळांसह रहात होत्या. या कालावधीत त्यांनी बुध्दभुषण डोगरदिवे (23) व त्याची आई कविता या दोघांच्या मध्यस्थीने मुलीची सोयरीक करुन लग्न लावून दिले होते. आपल्या मुलीचे परस्पर लग्न लावून दिल्याचा राग मनात ठेवत विनोद इंगळे याने बुध्दभुषणसोबत वाद घातला. सदर वाद विकोपाला गेल्याने बुद्धभुषण याने विनोद इंगळे याची दगडाने ठेचून हत्या केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here