प्रियकराने लग्नाला नकार देताच प्रेयसीने संपवले जीवन

अमरावती : गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध असणा-या तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्याने प्रेयसीने विषारी औषध घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. मोर्शी पोलिस स्टेशन हद्दीतील तरुणीसोबत हा प्रकार घडला. मानसिक धक्क्यातून प्रेयसीने बसस्थानकाच्या बाथरुममध्ये जाऊन उंदिर मारण्याचे विषारी औषध घेत आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मोर्शी पोलिस स्टेशनला विकी गोलाईत या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

19 वर्षाची तरुणी शिक्षणासाठी दररोज प्रवास करत होती. या कालावधीत तिचे विकीसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांनी कोर्ट मॅरेज करण्याचे निश्चित केले होते. मात्र ऐनवेळी त्याने नकार दिल्यानंतर ती खचली. त्यामुळे 7 एप्रिल रोजी तिने आत्महत्या केली. या घटनेनंतर 13 एप्रिल रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here