सासऱ्याच्या शेतात जावयाची आत्महत्या

जालना : सासरी गेलेल्या पत्नीला नांदण्यास पाठवत नसल्यामुळे त्रस्त जावयाने सासऱ्याच्या शेतात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना अंबड तालुक्यातील शेवगा येथे उघडकीस आली. दीपक दत्ता भोंडे (भाटेपुरी, ता. जालना) असे आत्महत्या करणा-या मयत जावयाचे नाव आहे. मयताच्या भावाने याप्रकरणी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

मयत दीपक भोंडे याचे शेवगा येथील जगन्नाथ शेळके यांची मुलगी शारदा हिच्यासोबत सुमारे बारा वर्षापुर्वी लग्न झाले होते. या दाम्पत्याला दहा वर्षाचा मुलगा देखील आहे. लग्नानंतर झालेल्या वादानंतर शारदा ही आपल्या माहेरी निघून आली. गेल्या तिन वर्षापासून ती माहेरीच रहात होती. पत्नी शारदाला घेण्यासाठी सासरी आला होता. मात्र शारदाच्या आईवडीलांनी तिला सासरी पाठवण्यास नकार दिला. याप्रसंगी झालेल्या वादादरम्यान जावई दिपक यास शिवीगाळ झाली. झालेली शिवीगाळ सहन न झाल्याने त्याने सास-याच्या शेतातच गळगास घेत आपली जीवनयात्रा संपुष्टात आणली. अधिक तपास अंबड पोलिस स्टेशनचे उप निरीक्षक मधुकर पाटील करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here