चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघींना पोलिस कोठडी

जळगाव : वृद्धाच्या हातातील पिशवी ब्लेडने कापून त्यातील 21 हजार रुपयांची रोकड लंपास करण्याचा प्रयत्न करणा-या दोघा महिलांना पारोळा न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. अंजली सिसोदिया (20), रचना सिसोदिया (30) रा.कठीया, जि.राजगड, मध्य प्रदेश अशी त्यांची नावे आहेत.

पारोळा शहरातील सेंट्रल बॅंकेसमोर असलेल्या फळविक्रेत्याच्या दुकानावर धर्मराज लोटन पाटील (68) रा. पारोळा हे उभे होते. त्यांच्या कब्जातील रोख रकमेची पिशवी ब्लेडने कापून त्यातील रक्कम लांबवण्याचा प्रयत्न दोघा महिलांनी केला होता. दोघा महिलांचा डाव वेळीच लोकांच्या लक्षात आला. त्यांनी दोघा महिलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याविरुद्ध भा.द.वि.379, 511, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here