वयोवृद्ध पक्षकाराने केला महिला वकिलाचा विनयभंग

अहमदनगर : 80 वर्ष वयाच्या वयोवृद्ध पक्षकाराने महिला वकीलाचा विनयभंग आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दशरथ तुकाराम गायकवाड (रा. भोयर पठार खुर्द ता. नगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वयोवृद्ध पक्षकाराचे नाव आहे.

गुन्हा दाखल करणारी फिर्यादी महिला वकील सिनियर वकिलाकडे ज्युनिअर वकील म्हणून कामकाज करत होती. त्या सिनीयर वकीलाकडे त्यांचा जुना वयोवृद्ध पक्षकार येत असे. तो ज्युनीयर वकीलाजवळ येऊन बसत होता असे फिर्यादी महिला वकीलाचा आरोप आहे. तसेच वयोवृद्ध पक्षकार तिच्याकडे वाईट नजरेने बघायचा असा देखील ज्युनीयर महिला वकिलाचा आरोप आहे. 19 एप्रिल रोजी पक्षकार गायकवाड यांनी फिर्यादीस म्हटले की तु माझ्यासोबत बोलत रहा, माझ्याशी संबंध ठेव अन्यथा मी तुझी बदनामी करेन. फिर्यादी महिला वकील तेथून निघून गेल्यानंतर वयोवृद्ध पक्षकाराने महिला वकीलाचा पाठलाग करत मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणत अंगाला स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here