कुसुंबा शिवारात तरुणाची विहीरीत उडी घेत आत्महत्या

जळगाव : जळगाव नजीक कुसुंबा शिवारात असलेल्या विहीरीत एका तरुणाने उडी घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत मयत तरुणाची ओळख पटलेली नव्हती. मयत तरुण सुमारे 35 वर्ष वयोगटातील असून त्याला विहीरीतून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळावर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. पोहता येत असलेल्या तरुणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह शव विच्छेदनकामी सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आला. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here