मनमाडला बहिणीने केली भावाची हत्या

नाशिक : मनमाड शहरातील विवेकानंद नगर परिसरात मद्यपी भावाची बहिणीच्या हातून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मनमाड शहर पोलिस स्टेशनला याप्रकरणी बहिणीविरुद्ध भावाच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा गारुडकर (55) रा. श्रीरामपूर असे बहिणीचे तर बाळू गोंगे (रा. विवेकानंदनगर, मनमाड) असे मयत भावाचे नाव आहे. मुलाचे निधन झाल्यापासून शोभा माहेरी मनमाड येथे आलेली होती.

भाऊ बाळू मद्यपान करून मंगळवारी दुपारी घरी आला. यानंतर बहिणीस शिवीगाळ व भांडण करू लागला. असे प्रकार नेहमीच होत असत. पण मंगळवारी या कृत्याचा बहिणीला राग आला. तिने भावाला धाक दाखविण्यासाठी चाकू हातात घेऊन धाक दाखवत असताना हा चाकू बाळूच्या पोटात गेला. गुन्हा घडल्यानंतर शोभा गारुडकर हिने स्वत:हून पोलिस स्टेशनला दाखल होत आपला गुन्हा कबुल केला. पो.नि. पी.बी. गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here