लाचखोर शाखा अभियंत्याकडे सापडले 43 तोळे सोने

औरंगाबाद : लेआऊट मंजूर करण्याकामी तीन लाख रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या सापळ्यात अडकलेल्या शाखा अभियंत्याकडे 43 तोळे सोने, साडे तिन किलो चांदी, 3 लाख 78 हजार रुपये रोख व मालमत्तेचे कागदपत्र असा ऐवज एसीबी पथकाला तपासणीदरम्यान आढळून आला आहे. संजय चामले असे लाचखोर शाखा अभियंत्याचे नाव आहे.

संजय चामले हा औरंगाबाद मनपातील गुंठेवारी विभागाचा प्रमुख तथा शाखा अभियंता पदावर कार्यरत आहे. शुक्रवारी संजय चामले हा तिन लाख रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला. संजय चामले याच्यावर झालेल्या एसीबीच्या कारवाईननंतर औरंगाबाद मनपाच्या नगर रचना विभागात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. या विभागात काही दलाल देखील आता धास्तावले आहेत. सेना नगर परिसरातील चामले याचा “महाद्वार” बंगला कारवाईदरम्यान बंद होता.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here