जांडू कंस्ट्रक्शन कंपनीस 18 करोड दंड भरण्याची नोटीस

जळगाव : दिलेल्या परवानगीनुसार निर्धारीत मुरुम उत्खनन करण्याऐवजी जादा स्वरुपात उत्खनन केल्याच्या आरोपाखाली जांडू कंस्ट्रक्शन कंपनीस 18 करोड 10 लाख रुपये दंड भरण्याची नोटीस धरणगाव तहसीलदार यांनी बजावली आहे. तिन दिवसांच्या आत याप्रकरणी कंपनीने लेखी खुलासा सादर करावा असे देखील नोटीसीत म्हटले आहे. सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीवर आधारीत आणि पाठपुराव्यामुळे एकाच महिन्यात महसुल विभागाकडून करोडो रुपयांंची दंडात्मक नोटीस देण्याची ही दुसरी घटना आहे. यामुळे अवैध गौण खणीज उत्खणन करणा-यांमधे खळबळ माजली आहे.

जळगाव शहरातून जाणा-या महामार्गाच्या कामाचे कंत्राट जांडू कंस्ट्रक्शन कंपनीस देण्यात आले आहे. या कामासाठी लागणा-या मुरुम या गौण खणिजाचे उत्खनन करण्याकामी पाळधी बु. ता. धरणगाव हद्दीतील जमीनधारक महेंद्र कृष्णा बागुल वगैरे यांच्यासमवेत कंपनीचा करार झाला आहे. गट क्रमांक 229/2 मधील उत्खननाचे मोजमाप 19404 ब्रास एवढे आहे. त्यापैकी 5600 ब्रास मुरुम उत्खननाची परवानगी महसुल विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र उर्वरीत 13804 ब्रासचे अवैध गौणखणिज उत्खनन जांडू कंस्ट्रक्शन कंपनीने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर जादा स्वरुपात उत्खनन केलेल्या गौण खणिजाची वाहतुक अनधिकृत असून विनापरवानगी केली असल्याचे तसेच शासनाची स्वामित्व धनाची रक्कम न भरता केल्याचे आढळून आल्याचे कंपनीला दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे.

सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी 30 मार्च 2022 रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे या जागेचा त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यावेळी या जागी कंपनीचे मुळ मालक  तसेच वाहन अथावा कुणी प्रतिनिधी हजर नव्हते. पंचनाम्यात तसा उल्लेख करण्यात आला आहे. तथापी उत्खनन परवाना जांडु कंस्ट्रक्शन कंपनीने घेतला असून तसा जागा मालकासोबत करार केलेला आहे. त्यामुळे हे उत्खनन आणि उचल कंपनीनेच केली असल्याचे दिसत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमानुसार कंपनीस 18 करोड 10 लाख रुपये दंडात्मक कारवाईची नोटीस धरणगाव तहसीलदारांनी बजावली आहे. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here