गुप्ता यांची माफी मागीतली नसल्याचा महिलेचा दावा

जळगाव : आपण धान्याचे व्यवस्थित  वितरण करत असून सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांची माफी मागीतली नसल्याचा दावा संबंधीत रेशन दुकानदार महिलेने “क्राईम दुनिया” कडे केला आहे. या बाबत खुलासा म्हणून संबंधीत रेशन दुकानदार  महिलेने “क्राईम दुनिया” कडे मोबाईलच्या माध्यमातून एक फॉर्वर्डेड मेसेज फॉरवर्ड करुन तो प्रसिद्ध करण्यास सांगितले.

याबाबत “क्राईम दुनिया”ने अगोदर प्रसिद्ध केलेल्या बातमीत सदर रेशन दुकानदार महिलेचे नाव, रेशन दुकान क्रमांक आदी कोणताही ओळख पटणारा तपशील प्रसिद्ध केलेला नाही. या बातमीसोबत देण्यात आलेल्या ऑडीओ क्लिप, फॉर्वर्डेड मेसेज आदींमधे देखील सदर रेशन दुकानदार महिलेच्या नावाचा ओळख पटणारा उल्लेख टाळण्यात आलेला आहे. आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशनला सदर महिलेविरुद्ध रितसर गुन्हा दाखल केला आहे.  

हक्काचे रेशन मिळण्याकामी एका लाभार्थी महिलेने सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्याकडे मदत मागीतली होती. पलीकडून मोबाईलवर बोलणा-या तक्रारदार महिलेच्या माध्यमातून संबंधीत रेशन दुकानदार महिलेकडे गुप्ता यांनी विचारणा केली. यावेळी संबंधीत रेशन दुकानदार महिलेने दीपककुमार गुप्ता यांच्याशी बोलतांना कमी अधिक प्रमाणात कठोर शब्द वापरले. त्याबाबत “क्राईम दुनिया” ने वृत्त प्रसिद्ध केले आहे. आपण गुप्ता यांची माफी मागीतली नसल्याचे सदर रेशन दुकानदार महिलेचे म्हणणे आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here