पुजा-यांनी गायब केले दोन तोळे सोन्याचे मंगळसुत्र

तुळजापूर : भाविकांनी मोठ्या श्रद्धेने वाहिलेले अंदाजे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र दोघा पुजा-यांनी लांबवल्याचे तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदीरात उघड झाले आहे. असे प्रकार यापुर्वी देखील झाले असून ते वेळोवेळी उघड झाले आहे. अशा पुजा-यांविरुद्ध काही दिवस मंदीर बंदीची कारवाई केली जाते. दत्ता सुभाष बर्वे व नागनाथ आबासाहेब भिसे असे या दोघा पुजा-यांची नावे असून त्यांच्याविरुद्ध देखील तिन महिने मंदीर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. 8 मे रोजी दुपारी 12 वाजून 50 मिनीटांनी घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही फुटेज मधे कैद झाला आहे. या फुटेजच्या आधारे मंदीर प्रशासनाने या दोघा पुजा-यांना मंदीर बंदी करण्यात आली आहे.

देवीचे मुखदर्शन तसेच धर्म दर्शन पास मिळवून देण्यासाठी भाविकांची अडवणूक करुन त्यांच्याकडून 751 रुपयांची मागणी व शिवीगाळ केल्याप्रकरणी संभाजी नेताजी क्षीरसागर या पुजा-याविरुद्ध तिन महिने मंदीर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच सहा महिने मंदीर बंदीची कारवाई का करण्यात येवू नये या आशयाची नोटीस देखील देण्यात आली आहे. दुस-या एका घटनेत व्हीआयपी प्रवेश द्वारावर भाविकांसोबत विनाकारण हुज्जत घातल्यामुळे अरविंद गोपाळराव अपसिंगेकर यांच्यावर देखील तिन महिने मंदीर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here