कोंबींग ऑपरेशन दरम्यान गुन्हेगार ताब्यात

जळगाव : जळगाव शहरातील कंवर नगर पोलिस चौकी परिसरात कोंबींग ऑपरेशन दरम्यान रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारास ताब्यात घेण्यात आले आहे. संजीव ग्यानप्रसाद सागर (33) रा. प्लॉट नं. 46-47, महालक्ष्मी दाल मिल, एम. आय.डी.सी. जळगाव असे त्याचे नाव आहे. तो स्वॅत:चे अस्तित्व लपवून चेहरा झाकून फिरत असतांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या ताब्यातील संजीव सागर हा पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार असून तो चोरी अथवा घरफोडी करण्याच्या उद्देशाने आपले अस्तित्व लपवत संशयास्पदरित्या फिरतांना आढळून आला. पो.कॉ. किरण प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या पथकातील स.फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. योगेश सपकाळे, पो.ना. सुनील सोनार, पो.ना. सचिन पाटील, म.पो.कॉ. राजश्री बाविस्कर, किरण पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here