महिलेस शिवीगाळ, तिच्या मुलांना मारहाण – सहा जणांना अटक

जळगाव : अंडापावच्या गाडीला लावलेले ग्रीन नेट फाडून नेल्याच्या संशयातून महिलेस शिवीगाळ व तिच्या दोघा मुलांना चापटा बुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ व जीवे ठार करणयाची धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

अंजनाबाई नारायण पाटील या महिलेच्या घरासमोर सुरज कुमावत नावाचा इसम अंडापावची गाडी लावतो. त्याच्या गाडीवर येणारे ग्राहक मद्यपान करुन येतात आणि आरडाओरड व शिवीगाळ करतात असा अंजनाबाईचा आरोप आहे. याबाबतीत अंजनाबाई व तिची दोन्ही मुले हेमंत पाटील व यशवंत पाटील हे सुरज कुमावत यास 15 मे रोजी समजावण्यास गेले होते. त्याचा राग आल्याने सुरज कुमावत, मनोज निंबाळकर, आबा केने, धिरज केने, केतन सोनवणे, निलेश निंबाळकर अशा सहा जणांनी अंजनाबाई यांच्या घरात अनाधिकारे प्रवेश करत त्यांच्या दोघा मुलांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली होती.

त्यानंतर 24 मे रोजी सुरज कुमावत याच्या गाडीला लावलेला हिरवा कापड कुणीतरी अज्ञात इसमाने फाडून नेला. हा कापड अंजनाबाईच्या मुलांनीच फाडून नेल्याचा संशय मनात ठेवत सुरज कुमावत व त्याच्या साथीदारांनी अंजनाबाईस शिवीगाळ करत तिच्या दोघा मुलांना चापटाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंजनाबाई नारायण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात धिरज अशोक केने (28) रा. पुर्वा मेडीकल जवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव, केतन जगदीश सोनवणे (23) रा. श्रीराम कन्या शाळेजवळ, लक्ष्मी नगर, जळगाव, विजेंद्र अशोक केने (30) रा. पुर्वा मेडीकल जवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव, मनोज प्रभाकर निंबाळकर (34) रा. हरेश नगर, आदीत्य हॉटेल चौक, रामेश्वर कॉलनी, जळगाव, सुरज संजय कुमावत (28) रा. राज शाळेजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव, निलेश प्रभाकर निंबाळकर (27) रा. हरेश नगर, आदीत्य हॉटेल चौक, रामेश्वर कॉलनी, जळगाव यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयत हजर केले असता त्यांना 26 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, स.फौ. आनंदसिंग पाटील, पो.ना. दत्तात्रय बडगुजर, पो.कॉ. सचिन पाटील, गोविंदा पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here