हरियाणा राज्यातील तरुणास गावठी कट्ट्यासह नरडाणा पोलिसांनी केली अटक

नरडाणा : मॅगझीनसह चार गावठी कट्टे, वेगवेगळ्या साईजचे पाच मॅगझीन, पाच जीवंत काडतुस असा एकुण अंदाजे 1 लाख 95 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह हरियाणा राज्यातून आलेल्या तरुणास नरडाणा पोलिस स्टेशनच्या पथकाने अटक केली आहे.

दोन इसम दभाषी गावाच्या बस स्थानक परिसरात गावठी कट्टे खरेदी विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती नरडाणा पोलिस स्टेशनचे स.पो.नि. मनोज ठाकरे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला होता. शक्तिसिंग सुरेशकुमार (31) रा. गांगटान पो.स्ट. डीगल ता. बेरी जि. झज्जर (हरियाणा) यास शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात आली. दरम्यान पोलिस आल्याची माहिती समजल्यानंतर त्याच्याकडे पिस्टल घेण्यासाठी येणारा त्याचा कपील जाट नावाचा साथीदार पसार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी नरडाणा पोलिस स्टेशनला गु.र.नं. 123/2022 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 चे उल्लंघन 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर उप विभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मनोज ठाकरे, पोहेकॉ प्रकाश माळी, पोहेकॉ सचिन सोनवणे, पोना बापू बागले, पोना सचिन माळी, पोना विजय पाटील, पोकॉ ग्यानसिंग पावरा, पोकॉ सुरेंद्र खांडेकर, पोकॉ गजेंद्र पावरा, पोकॉ अर्पण मोरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here