जळगाव जिल्ह्यात राबवले जाणार ऑपरेशन मुस्कान ११

जळगाव : सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली तसेच विपोमनि, महीला बाल अत्याचार प्रतिबंध विभाग मुंबई यांचे आदेशान्वये हरवलेल्या बालकांसंदर्भात ऑपरेशन मुस्कान ११ ही शोध मोहीम दिनांक ०१/०६/२०२२ ते ३०/०६/२०२२ या कालावधीत जळगांव जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे, पोलीस उप अधीक्षक (गृह), जळगाव प्रभारी अधिकारी, अ.मा.वा. प्रतिबंध कक्ष, जळगाव व सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखंडे यांच्यासह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, जळगाव यांच्याकडील पोलीस अंमलदार तसेच जिल्ह्यातील केशवस्मृती प्रतिष्ठान अंतर्गत समतोल प्रकल्प, जळगांव यांच्या सहकार्याने राबवण्यात येणार आहे.

सदर माहिमे दरम्यान जळगांव जिल्ह्यातील एकूण हरवलेल्या व सापडलेल्या बालकांची माहीती व विहीत नमुन्यात त्याचा डाटा बेस तयार करुन ती WWW.TRACKTHEMISSINGCHILD.IN या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिनांक ०१/०६/२०२२ ते ३०/०६/२०२२ या कालावधीत मुलांचे आश्रयगृह, अशासकीय संस्था, रेल्वे स्थानक, बस स्थानक, रस्त्यातील भिक मागणारी, वस्तु विकणारी मुले अथवा कचरा गोळा करणारी मुले, धामीक स्थळे, रुग्णालय, हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले अश्या मुलांना हरवलेली मुले समजुन त्यांचे फोटो घेवून त्यांची अद्ययावत माहीती तयार करण्यात येणार आहे. सदर कालावधीत सापडलेल्या मुलांची माहीती घेवून त्यांचे आई-वडील अथवा त्यांचे कायदेशिर पालक यांच्याकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत. अशा मुलांची छायाचित्र प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धीस दिली जातील. सदर मोहीमे दरम्यान हरवलेल्या जास्तीत जास्त बालकांचा शोध घेण्यात येवून त्याचे पुनर्वसन केले जाणार आहे. सदरची मोहीम जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशनमार्फत राबवली जाणार आहे. सदर ऑपरेशन मुस्कान ११ या मोहीमेस कुणी शासकीय, अशासकीय सामाजिक संस्था मदत करण्यास इच्छुक असल्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, जळगाव यांच्या कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here