डीवायएसपींच्या ऐवजी कर्मचा-याने दिली परीक्षा

जालना : सन 2019 मधे विधी परिक्षेसाठी परिक्षार्थी म्हणून डीवायएसपींच्या जागेवर पोलिस कर्मचा-याने परिक्षा दिल्याचे उघड झाले आहे. सुधीर खिरडकर असे संबंधीत डीवायएसपींचे नाव आहे. तसेच सोमनाथ शहादेव मंडलीक असे परिक्षा देण्यासाठी बसलेल्या डमी पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. याप्रकरणी कदीम पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे पत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या वतीने देण्यात आले आहे.

विधी अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली प्रथम वर्षाची ही परीक्षा होती. या परीक्षेत डमी परीक्षार्थी बसवल्याच्या तक्रारी विद्यापीठात प्रकर्षाने पुढे आल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत विद्यापीठाने समितीची नेमणूक केली. या समितीच्या चौकशीअंती सुधीर खिरडकर यांच्या जागेवर त्यांच्या ऐवजी पोलिस कर्मचारी सोमनाथ मंडलिक याने पेपर दिल्याची बाब पुढे आली. परीक्षा व मूल्यमापन संचालक मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांच्या सहीनिशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र कदीम पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here