पार्टीशनच्या फटीतून दोघांच्या प्रणयाचे चित्रीकरण– खंडणीच्या सापळ्यात कबुलीनामा देत आले शरण

अमरावती : नोकरीनिमीत्त दररोज होत असलेल्या प्रवासादरम्यान लिपीकाची एका महिलेसोबत ओळख झाली. दोघांचे ओळखीचे रुपांतर लवकरच प्रेमात आणि शरीरसंबंधात होण्यास वेळ लागला नाही. दरम्यान नोकरी करत असलेल्या गावी त्या लिपीकाने एक पार्टीशनची खोली भाड्याने घेतली. त्या खोलीत दोघे येवून भेटू लागले. पार्टीशनच्या खोलीत दोघांना एकांत मिळाल्यानंतर त्यांचे नको ते कारनामे सुरु झाले होते.

लिपीकाने भाड्याने घेतलेल्या त्या पार्टीशनच्या घराशेजारीच काही तरुण देखील भाड्याने रहात होते. लिपीक आणि त्या तरुणांच्या पार्टीशनची कॉमन वाल होती. त्या कॉमन प्लायवूडला एक छिद्र पाडून त्या तरुणांनी दोघांचे चाळे चोरुन लपून बघण्याचा सपाटा लावला होता. लिपीकाला संशय येवू नये यासाठी त्या छिद्राला एक नट बसवण्यात आला. बघण्याच्या वेळीच तो नट गुपचूप काढला जात होता. एके दिवशी दोघा तरुणांनी लिपीकाचे त्या महिलेसोबतचे गुपचूप फोटो काढून चित्रीकरण केले. विजय शेषराव टिकस (31), रा. वरुड आणि प्रीतम रामराम सुर्वे (38) रा. बहादा, वरुड अशी त्या दोघा तरुणांची नावे आहेत.

दोघांनी 30 मे रोजी त्या लिपिकाच्या मोबाईलवर फोन केला. तुझे एका मुलीसोबतचे फोटो व व्हिडिओ आमच्याकडे असून ते आम्ही व्हायरल करु. तसे करायचे नसेल तर आम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. सुरुवातीला त्या लिपिकाने दोघांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र काही दिवसांनी त्याच्या मोबाईलवर त्याच्या प्रेयसीसोबतचे फोटो दोघांनी पाठवले. आता लिपीक मनातून घाबरला. त्याने त्याच्या मोबाईलचा क्रमाक बदलून दुसरा मोबाईल क्रमांक वापरण्यास सुरुवात केली. तरीदेखील विजय आणि प्रीतम या दोघा तरुणांनी त्याचा दुसरा मोबाईल क्रमांक शोधून काढला.

9 जून रोजी दोघांनी त्या लिपीकाला फोन करुन धमकी दिली की आमच्याकडे असलेले चित्रीकरण तुझ्या घरी दाखवतो. असे करायचे नसल्यास अमरावती शहरातील राजापेठ परिसरातील रघुवंशी हॉस्पीटलजवळ येवून दहा लाख रुपये दे. दरम्यान वैतागलेल्या लिपीकाने राजापेठ पोलिस स्टेशनला संपर्क साधून खरा प्रकार कथन केला. त्यानुसार पोलिसांनी लिपीकामार्फत दोघांना फोन करुन रघुवंशी हॉस्पीटलजवळ येण्यास सांगीतले. दरम्यान साध्या वेशातील पोलिस पथक त्याठिकाणी दबा धरुन बसले होते. खंडणी मागणारे दोघे तरुण लिपीकाजवळ येताच त्यांना पोलिसांनी आपल्या तावडीत घेतले. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 12 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. राजापेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हे.कॉ. सागर सरदार करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here