मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

जळगाव :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चिमणराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी मुख्यमंत्री महोदय यांचे पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन स्वागत केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रांताधिकारी महेश सुधाळकर आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here