चोरीच्या तिन घटना उघडकीस – तिघे अटकेत

जळगाव : जळगाव तालुका, धरणगाव आणि एमआयडीसी अशा तिन पोलिस स्टेशनला दाखल चोरीचे गुन्हे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले आहेत. दोघा संशयीत गुन्हेगारांना ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशीअंती चोरीचे तिन गुन्हे उघडकीस आले आहेत. राजु भिमसिंग बारेला, दिपक सुमा-या बारेला (रा. मधुकर नगर धरणगाव) आणि रमेश फुलसिंग देवरे (रा. श्रीकृष्ण लॉन परिसर जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

राजु बारेला आणि दिपक बारेला या दोघांनी केलेले जळगाव तालुका आणी धरणगाव पोलिस स्टेशनला केलेले चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून दोन मोटार सायकली आणि एक मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याशिवाय मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने रमेश फुलसिंग देवरे याला ताब्यात घेतले असता एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. त्याच्याकडून एक मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध जळगाव शहर आणी जिल्ह्यात चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील स.पो.नि. निलेश राजपूत, पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, पोलिस अंमलदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, संदीप सावळे, नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, इश्वर पाटील, हेमंत पाटील, भारत पाटील, अशोक पाटील आदींच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला.     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here