घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : भारतीय जनता पार्टी घाटंजी तालुका व शहर यांच्या वतीने जम्मू कश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्लाचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारकडून या हल्ल्यातील अतिरेक्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी यावेळी निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार विजय साळवे यांना करण्यात आली.
यावेळी भाजपाचे नवनिर्वाचित घाटंजी तालुका अध्यक्ष विजयसिंह बैस, पंचायत समितीचे माजी उप सभापती रमेश धुर्वे, नगर परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रशांत उगले, पांढुर्णाचे उपसरपंच रितेश बोबडे, भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस रीना धनरे, महिला मोर्चाचे शहर अध्यक्ष साधना माडुरवार आदीं प्रामुख्याने उपस्थित होते.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ला अत्यंत दुःखद व निंदनीय व माणुसकीला काळीमा फासनारा आहे. या भ्याड हल्ल्यात निष्पाप नागरिक व सुरक्षा दलाच्या जवानांचे प्राण गेले आहे. देशाच्या सुरक्षेतेला आव्हान देणाऱ्या कृत्याचा आम्ही निषेध करतो. दहशतवादी विरोधात संपूर्ण देश एकसंघ असून अश्या हल्ल्यामुळे आमची राष्ट्रीय एकता खचनार नाही तर अधिक बळकट होईल या पार्श्वभूमीवर आपण शासनाच्या वतीने केंद्र सरकार कडे मागणी करावी, हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवान व नागरिक यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करीत आहे. त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहो असे निवेदन तहसीलदार विजय साळवे यांना दिले.
यावेळी दहशत वाद्यांच्या विरुद्ध घोषणा देण्यात आल्या यावेळी बंडू तोडसाम, विनय जाधव, मुज्जमील पटेल, रत्नाकर गावंडे, लक्ष्मण कोवे, प्रभाकर चटुले, नितिन खडसे, सुसिन ठाकरे, अमित पडलवार, प्रसाद पेंदोर, अशोक राठोड, प्रमोद महल्ले, सतीश चट्टेकार, कन्हेया कावळे, लता ठाकरे, माधुरी कहाळे, मंगला खांडरे, अल्का ठाकरे, वनिता खांडरे, अल्का रामगडे आदीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.