बनावट कागदपत्र प्रकरणातील संशयित तिवारींचा जामीन रद्द

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : बनावट कागदपत्राच्या आधारे तोतया शेतमालकास उभे करुन फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी शिवा तिवारी यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित शिवा तिवारी (रा. चापमनवाडी), निलेश राठोड, अमजद खान (रा. वाई ता. माहूर) व इतर आरोपी विरूद्ध शहर पोलिस स्टेशनला गु.र. न.२३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८ (४), ३३६ (२) (३), ३४० (२) व ३ (५) अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले होते. 

या प्रकरणी संशयित शिवा तिवारी यांच्या वतीने ॲड. एजाज तगाले यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. यवतमाळचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अमीत लऊळकर यांच्या न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. नरेंद्र पांडे यांनी तर संशयित तिवारी यांच्या तर्फे ॲड. एजाज तगाले यांनी युक्तीवाद केला. सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राहय धरत संशयित शिवा तिवारी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अमीत लऊळकर यांनी फेटाळला. 

संशयित शिवा  तिवारी याला ड्रग्ज प्रकरणी दाखल गुन्ह्यात या पुर्वी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपीला जामीन मंजूर झाल्याने त्याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी व आरोपी तपास कार्यात सहकार्य करत नसल्याने यवतमाळ पोलीसांनी यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here