माहिती अधिकार कार्यशाळेचे 26 रोजी आयोजन

On: June 24, 2025 10:40 AM

जळगाव : माहिती अधिकार कायदा 2005 च्या 20 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा उत्सव आणि सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यासाठी जळगाव शहरात 26 जून रोजी भव्य माहिती अधिकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जळगावचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. जळगाव शहरातील भैय्यासाहेब गंधे हॉल ला. ना. हायस्कूल येथे दुपारी चार ते आठ वाजेच्या दरम्यान या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत जागरुक करणे आणि प्रशासकीय पारदर्शकतेला प्रोत्साहन देणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

Oplus_131072

आयोजक दीपककुमार गुप्ता यांच्यासह जवान फाऊंडेशनचे अध्यक्ष ईश्वर मोरे या कार्यक्रमाचे सहआयोजक आहेत. विशेष अतिथी व व्याख्याते म्हणून यशदा पुणेचे राष्ट्रीय प्रशिक्षक नितीन विजय पाटील हे उपस्थित राहणार असून माहिती अधिकार कायद्याची प्रशासकीय अंमलबजावणी या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत. पुण्याचे प्रख्यात माहिती अधिकार कार्यकर्ता विजय कुंभार हे सामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून माहिती अधिकार कायद्याचा प्रभाव आणि महत्त्व या विषयावर आपले विचार प्रकट करतील. पुण्याचे सामाजिक कार्यकर्ता विवेक वेलणकर हे माहिती अधिकार कायद्याचा योग्य वापर या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.

जळगाव महानगरपालिका, जळगाव जिल्हा पोलिस विभाग, वस्तु व सेवाकर विभाग ( महाराष्ट्र राज्य ), जळगाव जिल्हा परिषद यांचे जन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय अधिकारी, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक आदींचा या कार्यक्रमात सहभाग असेल. प्रश्नोत्तरे आणि चर्चा सत्राच्या माध्यमातून उपस्थितांना माहिती अधिकार कायद्याबाबत मार्गदर्शन मिळेल.

माहिती अधिकार कायद्याच्या वीस वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणे. सामान्य नागरिकांना त्यांच्या माहितीच्या हक्काबाबत सक्षम करणे. प्रशासकीय पारदर्शकता आणि जबाबदारीला चालना देणे आदी प्रमुख उद्देश या कार्यक्रमाचे आहेत. या कार्यक्रमाला प्रवेश निशुल्क असला तरी नोंदणी आवश्यक आहे. अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती देण्याचे आवाहन सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांच्या 9890809030 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment