देशी दारुची अवैध वाहतुक – पथकावर प्राणघातक हल्ला

कल्याण : देशी दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवल्याने उत्पादन शुल्क अधिकारी व त्यांच्या पथकावर कार्यालयासमोरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याण येथे घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेत पुढील कारवाई सुरु केली आहे.

कल्याण उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सुनील कणसे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चिंचपाडा परिसरात एका अल्टो कारमध्ये काही जण देशी दारू घेऊन येणार असल्याचे समजले होते. त्या माहितीनुसार सुनील कणसे व त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला होता. यावेळी संशयीत कारमधे देशी दारु सापडली. त्यामुळे कारचालक दीपक पगारे याला ताब्यात घेऊन पथक कल्याण पश्चिमेकडील कार्यालयात पोहचले.

कार्यलयासमोर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी अडवण्यात आली. तुम्हाला कारवाईसाठी आम्हीच भेटतो का? असा सवाल टोळक्याकडून करण्यात आला. यावेळी टोळक्याकडून काठी, लोखंडी सळईने पथकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात सुनील कणसे यांच्यासह तिघे कर्मचारी जखमी झाले. दरम्यान मारहाण करणाऱ्या टोळीतील काही तरुणांना उत्पादन शुल्क कर्मचा-यांनी पकडून कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी कोलसेवाडी पोलिसांनी राजेश चोळेकर, लहू म्हात्रे यांना ताब्यात घेत अटक केली. दरम्यान काही जण फरार होण्यात यशस्वी झाले.

हे देखील वाचा – नागपूरात वेश्यावस्तीवर छापा – 16 महिलांसह 12 पुरुष ताब्यात

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here