नाथाभाऊ रा.कॉ.त जाण्याचे संकेत? – खडसे योग्य तो निर्णय घेतील -फडणवीस

जळगाव : बिजेपीचे बडे नेते एकनाथराव खडसे हे लवकरच रा.कॉ. पक्षात जाणार असल्याचे जवळपास निश्चीत झाले असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. एकनाथराव खडसे यांच्या भुमीकेकडे राजकीय क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथराव खडसे यांच्या रा.कॉ.पक्षात जाण्याबद्दलच्या विषयावर मोठे विधान केले. देवेंद्र फडणवीस ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आज जामनेर शहरात आले होते. तत्पुर्वी गिरीश महाजन यांच्या निवासस्थानानी काही निवडक आमदारांसमवेत देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेतली.

जळगाव येथील काही मोजक्याच आमदारांसमवेत काही वेळ चर्चा सुरु होती. या बैठकीनंतर फडणवीस बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ‘एकनाथराव खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते असून ते आमच्यासमवेत रहावे अशी आमची सर्वांची इच्छा असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे असे बोलतांना ते म्हणाले की राजकारण कसे आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे’ असे फडणवीस म्हणाले.

एकनाथराव खडसे यांच्यासोबत आज कोणतीही चर्चा झाली नाही. योग्यवेळी मी चर्चा करेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की, खडसे हे योग्य निर्णय घेतील’ असेही फडणवीस बोलतांना म्हणाले

राष्ट्रवादी पक्षात प्रवेशानंतर एकनाथराव खडसे यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे देखील समजते. एकनाथराव खडसे यांच्या सोबत कोणकोण रा.कॉ. येणार याची देखील राजकीय क्षेत्रातील मंडळींना उत्सुकता लागून आहे. दरम्यान खडसे हे लवकरच नी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here