रा.कॉ. त गेल्यावर खडसेंना मिळणार कृषी मंत्रीपद?

मुंबई : ब-याच दिवसांपासून भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्या रा.कॉ. प्रवेशाबाबत राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु आहे. सोमवारी रा.कॉ.चे सुप्रिमो शरद पवार यांनी एकनाथराव खडसेंबाबत विधान केल्यानंतर राष्ट्रवादीतील हालचालींना गती आली आहे. आता २२ ऑक्टोबर रोजी एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत शरद पवार यांच्य उपस्थितीत एकनाथराव खडसे रा.कॉ.त प्रवेश करणार आहेत. खडसे समर्थक कार्यकर्त्यांना मुंबईत हजर राहण्याच्या सुचना देखील मिळाल्या असल्याचे समजते. त्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या असल्याचे समजते.

रा.कॉ. त गेल्यावर खडसे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज्यमंत्रीमंडळाच्या खांदेपालट दरम्यान शिवसेना-राष्ट्रवादी खात्यांची अदलाबदल करून एकनाथराव खडसे यांना कृषिमंत्री पद दिले जाणार असल्याची चर्चा देखील या निमीत्ताने सुरु आहे.
एकनाथराव खडसे यांच्या कार्याची ज्या ठिकाणी नोंद घेतली जाईल त्या ठिकाणी जाण्याची त्यांची भुमिका असू शकते असे वक्तव्य करुन शरद पवारांनी एक प्रकारे सुचक वक्तव्य केले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रा.कॉ. च्या जळगावातील नेत्यांकडून खडसे रा.कॉ. त आल्यावर काय दूरगामी परिणाम होवू शकतात याची चाचपणी घेतली होती. मात्र त्या चाचपणी बैठकीचा तपशील बाहेर आला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here