चलनातून बाद ९८ लाख ९२ हजाराच्या नोटा जप्त,औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जप्त मुद्देमाल

औरंगाबाद: चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या ९८ लाख ९२ हजार रुपयांच्या नोटा औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. एका हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी दोन महिलांसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. प्रियंका सुभाष छाजेड (वय ३०) रा . कामगार कॉलनी चिकलठाणा, नम्रता योगेश उघडे (वय ४०)  रा . देवानगरी, मुश्ताक जमशीद पठाण (वय ५३)  रा टाईम्स कॉलनी आणि हशीम खान बशीर खान (वय ४५) रा . लक्ष्मण चावडी अशी मुद्देमालासह ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

जालना रोडवरील पाटीदार भवन शेजारी असलेल्या हॉटेल ग्लोबल इनच्या पहिल्या माळ्यावर थांबलेल्या लोकांकडे मोठ्या प्रमाणात हार्ड कॅश असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने स्थानिक गुन्हे शाखेला दिली होती. त्यानुसार  पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद , उपायुक्त मीना मकवाना , पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला.

या पथकात सहायक निरीक्षक मनोज शिंदे ,कर्मचारी नितीन मोरे , भगवान शिलोटे आदींनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here