पालघर जिल्हयात अफवांचे पिक आले भरुन ! अंत्ययात्रेला जाणा-या साधूंना टाकले मारुन !!

Imaginary indian saint

अफवा आणि अफू या दोन्ही गोष्टी जवळपास सारख्याच असतात. अफवा ही एकप्रकारे अफूच्या गोळीप्रमाणे काम करत असते. अफूची गोळी घेतल्यावर मनुष्याची बुद्धी व्यवस्थीत काम करत नाही. ती भ्रमिष्ठ होते. मनुष्याची
बुद्धी अफवेमुळे भरकटते
. अफवेच्या
माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण करणे
, वाद निर्माण करणे एवढेच नव्हे तर दंगली घडवणे असे प्रकार केले जातात.
आपल्या
देशात अफवा आगीच्या वणव्याप्रमाणे लगेच पसरते हे काही घटकांनी चांगल्या प्रकारे हेरले
आहे
. अफवांच्या
माध्यमातून विशिष्ट कृती घडवून आणली जाते
.अफवेवर विश्वास ठेवून कृती करण्याची अथवा घडवून आणण्याची
मानसिकता काही लोकांनी ओळखलेली आहे
. अफवा पसरवण्याचे सर्वात सोपे माध्यम म्हणजे सोशल मिडीया. काही नवशिके नेट युजर्स सोशल मिडीयावर आलेली बातमी अर्थात अफवा मागचा पुढचा विचार
न करता लागलीच पुढे फारवर्ड करतात
. आलेली पोस्ट पुन्हा काही नवशिके लोक तशीच्या तशी पुढे  फारवर्ड करतात. अशा प्रकारे ती पोस्ट पुढे पुढे सरकत जाते व ती अफवा मोठया प्रमाणात पसरते. धार्मिक आणि भावनिक विषय  अफवेच्या माध्यमातून  लवकर प्रसारीत होत असतात. ती अफवा अफूच्या गोळीप्रमाणे काम करत जाते.
महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्हयात डहाणू  हे तालुक्याचे गाव आहे. या तालुक्यातील गडचिंचले या गावी काही दिवसांपुर्वी दुर्दैवी तिहेरी हत्याकांड झाले. या हत्याकांडाचे मुळ अफवेमधे दडले असल्याची माहिती पुढे
येत आहे
. या तिहेरी हत्याकांडाने समाजमन सुन्न झाले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी अर्थात लॉकडाऊन सुरु असताना चोर, दरोडेखोर मुत्रपिंड काढण्यासाठी नागरिक
वेषांतर करुन फिरत असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून या जिल्हयाच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरली होती. या अफवा पसरवण्यासाठी सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे लोक खुलेआम बोलत आहेत. लॉकडाऊन सुरु असले तरी देखील स्थानिक मंडळी रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडून येणाया जाणाया वाहनधारकांना अडवून जाब विचारण्याचे तसेच मारहाण करण्याचे प्रकार करत होते. येणाया जाणाया वाहनधारकांची चौकशी करण्याचे काम पोलिसांचे असले तरी ते काम स्थानिक लोक लॉकडाऊन तोडून करत होते. बाहेर मुक्तसंचार केल्यामुळे आपण कोरोनाच्या संपर्कात येवू शकतो याचा विचारच कुणी करत नव्हते.
पूज्य संत रामगिरी महाराज यांचे 16 एप्रिल रोजी सुरत (विहारा) येथील
आश्रमात निधन झाले होते. मुंबईच्या कांदिवली येथील  आश्रमात
त्यांचे शिष्य महंत कल्पवृक्ष गिरी उर्फ चिकणे महाराज (वय 70 वर्ष) सुशील गिरी महाराज ( वय 35 वर्ष) हे रहात होते. आपल्या
गुरुचे निधन झाल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी जाण्याचे दोघा शिष्यांनी ठरवले. परंतु सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्यामुळे अर्थातच संचारबंदी सुरु
होती आणि
वाहतुक व्यवस्था बंद होती. तरीही खासगी वाहनाने आपल्या गुरुच्या अंत्यविधीसाठी जाण्याचे दोघांनी ठरवले.  महंत कल्पवृक्ष गिरी उर्फ चिकणे महाराज सुशील गिरी महाराज यांनी निलेश तेलगंडे या चालकाला त्याच्या वाहनासह सोबत घेत सुरत (विहारा) येथे जाण्याचे नक्की केले.
लॉकडाऊन काळात जिल्हाबंदी असल्यामुळे मुंबईअहमदाबाद
महामार्गावरून जाणे अडचणीचे ठरेल ही बाब बहुदा चालक तेलगंडे याने हेरली असावी. त्यामुळे छुप्या मार्गाने मनोरविक्रमगडजव्हारखानवेल
असा प्रवास करत केंद्रशासित प्रदेश असलेल्या सिल्वासा मधून पुढे सुरत गाठण्याचा प्लॅन त्यांनी कदाचीत केला असावा. दोघे शिष्य
चालकाच्या मदतीने आपल्या गुरुच्या अंत्यविधीसाठी निघाले खरे परंतु नियतीला ते मान्य नसावे.
लॉकडाऊन काळात चोर, दरोडेखोर वेषांतर करुन फिरत असल्याची अफवा पालघर जिल्हयाच्या ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात पसरली होती. दरम्यान कांदिवली (मुंबई) येथून गुजरात राज्यात आडमार्गाने
प्रवेश घेऊ पाहणाऱ्या तिघांची डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे स्थानिक रहिवाशांनी अडवणूक केली. त्यावेळी रात्रीचे साडेनऊ वाजले होते. या गावकयांच्या मनात अफवांचे पिक मोठ्या प्रमाणात शिरले होते.
लॉक डाऊन सुरु असताना इतक्या रात्री मुंबईची गाडी इथे आलीच कशी? पोलीस किंवा कुणी तुम्हाला अडवलेच कसे नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती जमावाने त्यांच्यावर सुरु केली. तिघे चोरच आहेत, यांना
सोडायचेच नाही असा जमावाचा हेका सुरु झाला. आपण चोर नसून साधू आहोत आम्ही आमच्या गुरुच्या अंत्यविधीसाठी जात आहोत असे स्पष्टीकरण महंत कल्पवृक्ष गिरी उर्फ चिकणे महाराज सुशील
गिरी महाराज जमावाला देत होते. मात्र जमाव त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.
संतापाच्या भरात अफवांच्या आधारे गावकऱ्यांनी तिघांसह त्यांची कार उलटवून टाकली. त्यात तिघे जबर जखमी झाले. कासा पोलीस स्टेशनच्या
हद्दीत गडचिंचले गावाजवळ वन विभागाच्या
चौकीजवळ हा अमानवीय प्रकार सुरु होता. या प्रकाराची माहिती कासा पोलिसांना रात्री दहा वाजता समजली. माहिती मिळाल्यावर कासा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आपल्या कर्मचारी वर्गाच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. तो पर्यंत जमाव मोठ्या प्रमाणात प्रक्षुब्ध झाला होता. पोलिसांसोबत जिल्हा परिषदेचे सभापती काशीनाथ चौधरी देखील आले होते. दरम्यान तिघांना जमावाने लाठ्याकाठ्यांसह दगडांनी
व शस्त्रांनी
मारहाण करत अर्धमेले करुन सोडले होते.
पोलिसांचे पथक घटनास्थळावर पोहोचेपर्यंत तिघे कारमधेच रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. पोलिस पथक येताच अल्प प्रमाणात जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आले. तिघा जखमींना पोलीसांनी गावकयांच्या तावडीतून पोलिस व्हॅन पर्यंत कसेबसे आणले. दोघांना पोलिसांनी व्हॅनमधे कसेबसे बसवले. दरम्यान आपला जिव वाचवण्यासाठी वयोवृद्ध सत्तर वर्षाचे
कल्पवृक्ष गिरी महाराज पोलिसांच्या
व्हॅनमधे चढत असताना जमाव पुन्हा प्रक्षुब्ध झाला.
तुम्ही यांना कुठे घेऊन चालला? असा सवाल जमावाने विचारण्यास सुरुवात केली. पोलिसांनी गावकयांची कशीबशी समजूत काढण्यास सुरुवात केली. दरम्यान मोठ्या संख्येत असलेल्या जमावाने
पोलीस वाहनावर जबर दगडफेक
सुरु केली. या दगडफेकीमुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांना पळवून लावण्याचा प्रकार जमावाकडून सुरु झाला. प्रक्षुब्ध जमाव दगड, काठ्या
इतर घातक शस्त्रांचा सर्रास वापर करत होता. संतप्त जमाव पोलिसांचे देखील ऐकण्यास तयार नव्हता. पोलिसांच्या बोलण्याकडे अर्थात समजावण्याकडे दुर्लक्ष करत जमावाने सरळ पोलिसांसह त्यांच्या वाहनावर वाहनातील तिघा जखमींवर चाल केली.
या तिघांचा फैसला इथेच काय तो  करा इथून यांना
न्यायचे नाही. नाहीतर
आमच्या ताब्यात द्या, आम्ही
फैसला करतो असा सुर जमलेल्या गावकयांनी
लावला. इतकेच
नव्हे तर थेट पोलिस व्हॅनमध्ये शिरून पोलिसांच्या ताब्यातील जखमींना हाती लागेल त्या साधनांनी अमानुष निर्दयी मारहाण करत ठार केले. जमावाच्या मारहाणीत पोलिसांच्या साक्षीने तिघांनी आपला जिव सोडला. पोलिस हतबलपणे हा सारा  प्रकार
बघ होते. पोलिस
जणू काही या घटनेचे मुक साक्षीदार बनले होते. तिघांची हत्या झाल्यानंतर जमाव मोठ्या प्रमाणात पळून गेला. 
प्रसंग हाताबाहेर जात असल्याचे समजताच जिल्हा
पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी अजुन ताफा घटनास्थळी रवाना केला. घटनास्थळाला जणू काही छावणीचे स्वरुप प्राप्त झाले. सोळा एप्रिलच्या रात्रीपासून सतरा एप्रिलच्या सकाळपर्यंत पळून गेलेल्या मारेकयांचे अटकसत्र सुरु झाले. हे अटकसत्र तिसया दिवशी शनिवारी 18 एप्रिलपर्यंत सुरुच होते. या अटकसत्रात शंभराहून अधिक मारेकयांना अटक करण्यात आली.
गावात जंगलात लपून बसलेल्या हल्लेखोरांन शोधून काढण्यात आले. यातील 101 जणांना पोलिस कोठडीत तर नऊ अल्पवयीनांना बालसुधारगृहात रवाना करण्यात आले. या प्रकरणी कासा पोलिस स्टेशनला तिन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.
पालघर जिल्हयाच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले या गावातील घटनेने पोलिस प्रशासनाला हादरा बसला आहे याशिवाय समाजमन देखील सुन्न झाले आहे. या घटनेपूर्वी चारपाच दिवस अगोदर
डहाणू तालुक्यातील या भागात सोशल मिडीयाच्या माध्यमातून अफवांचे पिक उतू आले असल्याची पोलिस प्रशासनाला माहिती होती. गावात चोर येत असल्याच्या अफवेने गावकरी कुणाचे ऐकून घेण्याच्या वा समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही हे स्थानिक पोलिस प्रशासनाने लक्षात घेणे गरजेचे होते. तो पोलिस प्रशासनाला जणू काही सुचक इशारा होता. पोलीस प्रशासनाला गोपनीय विभागामार्फत तसेच खबयांमार्फत ही माहिती पोहोचली नसेल का? नक्कीच पोहोचली असेल.
या घटनेपुर्वी 12 एप्रिल रोजी सर्वपरिचीत असलेले गोरगरिबांना मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वास
वळवी हे या परिसरातून कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर मदतकार्य आटोपून परत जात होते. मात्र त्यांचे देखील म्हणणे गावकरी ऐकून घेण्यास तयार नव्हते. त्यावेळी वळवी यांनी पोलिसांना पाचारण केले होते. त्यावेळी गावकयांनी पोलिसांना देखील जुमानले नव्हते. त्यादिवशी देखील पोलिसांवर दगडफेकीचा प्रकार घडला होता. त्या दिवसापासून पोलिसांना हा एक सुचक इशाराच होता. अफवांच्या पिकांमुळे गावपरिसरात काय सुरु आहे याची पुरेपुर कल्पना पोलिस प्रशासनाला आलेली होती हे नाकारता येणार नाही. त्याप्रमाणे आवश्यक पावले उचलायला हवी होती. या घटनेच्या वेळी पोलिसांसमवेत आलेले जिल्हा परिषद सभापती काशिनाथ चौधरी यांनी जमावाला तुम्ही जे काही करत आहात त्याचे गंभीर परिणाम होतील असे समजावून सांगण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र गावकयांनी त्याचे   सरपंचांचे देखील ऐकले नाही. या अफवांच्या पिकात तिघे जण अमानुषपणे मारले गेले. तिघे जण चोर असल्याच्या संशयाने पछाडलेल्या गावकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे पोलीसही हताश निष्प्रभ
ठरले.
घटनेच्या दिवशी कांदिवली मुंबई येथील हे तिघेजण त्रंबकेश्वरवरून खानवेल मार्गे  नगर हवेली  पुढे सुरत या मार्गावरील  विविध
तपासणी नाक्यांना चुकवत प्रवास करत असल्याची माहीती पुढे येत आहे. हे तिघेही जण कारने नगरहवेली पर्यंत पोहोचले. परंतु तेथे त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले. याच मार्गावर
हद्दीच्या ठिकाणी मोठे झाड आडवे केल्याने पुढे जाण्याचा त्यांचा मार्ग खुंटला होता असेही समजते. परिणामी
तिघेजण मुंबईसाठी मागे फिरले या गावात रात्रीच्या दरम्यान पोहोचले असता गावकऱ्यांनी त्यांना अडवले. हे गाव नगर हवेलीच्या
सिमेवर असून नगरहवेली पासून सुमारे अर्धा किलो मीटर अंतरावर ही घटना घडली. तुम्ही
कुठून आला आहात? कोण आहात? कुठे चालला? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती गावकऱ्यांनी यावेळी त्यांना केली.
या घटनेपूर्वीही अजून एक घटना घडली होती. या परिसरात दोघेजण दिसून आल्यानंतर ते चोर असल्याचा संशय येथील नागरिकांनी व्यक्त केला होता. अखेरीस हे दोघेजण हॉटेलमधील कामगार असल्याचे समोर आले त्यांची कशीबशी सुटका झाली होती.  
अफवांवर चुकीच्या माहीतीवर विश्वास ठेवू नका चोर फिरत आहेत या अफवा आहेत. अशा अफवा पसरवू
नका असे आवाहन प्रशासनाकडून केले जात होते. मात्र हे आवाहन पुरेसे नव्हते. चोर येत असल्याच्या
भीतीयुक्त मानसिकतेतून ग्रामस्थांना बाहेर काढायला हवे होते. दुर्दैवाने
तसे झाले नाही त्याचे गांभीर्यही
पोलीस प्रशासनाने  ओळखले
नाही असे बोलले जात आहे.
 गेली कित्येक वर्षे या भागात आदिवासी समाजात काम करणाऱ्या कष्टकरी संघटनेने डहाणूचे तहसीलदार स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती दिली होती. आमचा संघटनेच्या माध्यमातून गावांमध्ये संपर्क आहे. आम्ही गावकऱ्यांना समजावून सांगू. ते आमच्या
बोलण्यावर विश्वास ठेवतील आमचे ऐकतील
असा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे विश्वास व्यक्त केला होता. त्यासाठी गावपाड्यात जाण्याची परवानगी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशसनाला मागीतली होती. मात्र या विनंतीला पोलिस महसुल प्रशासनाकडून  प्रतिसाद
मिळाला नाही. या कार्यकर्त्यांना गावात जाण्यास त्याच वेळी परवानगी दिली असती तर ही घटना टळली असती असे बोलले जात आहे.
जमावाची आक्रमकता, प्रक्षुब्धता लक्षात घेऊन पोलीस सुमारे दहा फैरी झाडू शकले असते. मात्र
या नंतर देखील जमाव शांत झाला नाही तर मोठी गंभीर परिस्थिती उदभवू शकते असा विचार करून पोलिसांनी गोळीबार टाळला असावा असे देखील बोलले जात आहे. पोलिसांची ही हतबलता चिंताजनक अनेक प्रश्न निर्माण करणारी असल्याचे देखील बोलले जात आहे. निव्वळ
चोर आल्याच्या संशयातून हत्या होत असेल तर ही निश्चितच चिंतनिय बाब आहे. त्याहून चिंतनीय बाब अशी की सर्वत्र लॉकडाऊन सुरु असतांना तिघांना वाटेत पोलिसांनी अटकाव का केला नाही? एकंदरीत या घटनेने समाजमन सुन्न झाले असून तिव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सुरुवातीला 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठली सुनावली आहे. यातील नऊ संशयीत अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी कासा पोलिस स्टेशनला 302,353,188 इतर कलमानुसार हल्लेखोरांवर गुन्हा दाखल आहे. केवळ चुकीच्या अफवांमुळे महंत कल्पवृक्ष गिरी उर्फ चिकणे महाराज (70) , महंत सुशिलगिरी महाराज (35) त्यांचा चालक निलेश तेलगंडे (30) यांचा नाहक बळी गेल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा तपास आता सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. सीआयडीचे वरिष्ठ स्तरावरील अधिकारी,पोलीस महानिरीक्षक,कोकण महासंचालक आदींनी घटनास्थळाला भेट दिली आहे. उर्वरीत आरोपीतांचा शोध ड्रोन द्वारा केला जात आहे. या प्रकरणाला काही जणांकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते. दोन समाजात तेढ निर्माण करु नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. हे प्रकरण व्यवस्थित हाताळता आले नाही असा ठपका ठेवत कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव काळे पोलीस उप निरीक्षक सुधीर कटारे यांचेवर ठेवत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांना निलंबित केले आहे.
 




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here