चाहत्याने केला किसींग संपर्क, अभिनेत्रीला झाला कोरोना संसर्ग

बिग बॉसमुळे ब-यापैकी लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री अर्शी खानला तिच्या एका चाहत्यामुळे कोरोनाची लागण झाली असल्याचे म्हटले जात आहे. बिग बॉस या शो मधून बाहेर आलेली अर्शी खान विमानतळावर माध्यमांसोबत बोलत होती. त्यावेळी अचानक एक चाहता तिच्याजवळ आला. त्याने तिच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा जाहीर केली. तिने देखील त्या चाहत्याला सेल्फी काढू देण्यास होकार दिला. फोटो काढल्यानंतर अचानक त्या चाहत्याने तिच्या हातांचा किस घेतला.

काही कळण्याच्या आत तो चाहता तेथून गायब देखील झाला. य प्रकाराने भांबावलेल्या अर्शी खानने देखील स्वत:ला सावरत तेथून प्रस्थान केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर दोन दिवसांनी तिला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. किस करुन गेलेला तो चाहता कोरोना बाधीत रुग्ण होता का? हे समजू शकले नाही. अर्शी खान सध्या होम क्वारंटाइन आहे. बघा व्हिडीओ ……..

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here