अर्णब गोस्वामी यांच्यामुळे पैसे थकल्याने पतीने केली आत्महत्या – अन्वय नाईक यांच्या पत्नीचा आरोप

On: November 4, 2020 2:36 PM

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगड पोलिसांच्या पथकाने अटक केली. सन २०१८ मध्ये इंटेरियर डिझानयर अन्वय नाईक यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक झाली आहे.अर्णब गोस्वामी यांच्यामुळे पैसे थकले व परिणामी त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नाईक यांच्या पत्नीने आज पत्रकार परिषदेत केला.

याप्रसंगी त्यांची मुलगी देखील त्यांच्यासोबत हजर होती. अन्वय यांच्या पत्नीने पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले, की संबंधितांनी आपल्या पतीचे 83 लाख रुपये थकवले. आम्हाला कोणत्याही राजकारणात पडायचे नसून आम्हाला केवळ न्याय हवा आहे.

आज झालेली अटक पूर्वीच होणे आवश्यक होते. यावेळी नाईक यांच्या मुलीने सांगितले की माझ्या वडिलांनी रिपब्लिक टिव्हीचे अर्णब गोस्वामी, आयकास्ट एक्सचे फिरोज शेख व नितीन सारडा तिघांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिली होती. अलिबाग न्यायालयात गोस्वामी यांना आज हजर केले जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment