ट्रेनचे तिकीट कॅन्सल करताच मिळणार लगेच रिफंड

On: February 14, 2021 2:18 PM

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने आयपे नावाचे नवीन पेमेंट गेटवे लॉंच केले आहे. या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना तिकीटाचे पेमेंट करणे सुलभ होणार आहे. या गेटवेच्या माध्यमातून प्रवासी तिकीट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड देखील मिळणार आहे. आयपे गेटवे या सुविधेसोबत ऑटो पे ही सुविधा आयआरसीटीसीकडून देण्यात आली आहे.

सध्याच्या घडीला रेल्वे प्रवाशांना तिकीट कॅन्सल केल्यानंतर रिफंडसाठी साधारण दोन ते तिन दिवसांची वाट बघावी लागते. मात्र आयआरसीटीसी वेबसाईट अथवा मोबाईल अ‍ॅपवरुन तिकीट बुक केल्यानंतर आयआरसीटीसी आयपे च्या माध्यमातून तात्काळ पैसे परत मिळतील. या नव्या पेमेंट गेटवेच्या वापरामुळे वेळेची बचत होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment