कॉंग्रेसचे सचिन सोमवंशी यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबीर

On: April 17, 2021 9:30 PM

पाचोरा : कोरोना महामारीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात रक्ताचा देखील तुडवडा भासत आहे. रक्ताचा तुटवडा लक्षात घेत पाचोरा कॉग्रेसने आघाडी घेत रक्तदान शिबीराचे नुकतेच आयोजन केले. कोरोना महामारीत रक्तदाते बोटावर मोजण्या इतके असतात त्यामुळे रक्तदान देखील महत्त्वाचे असते. महाराष्ट्रभर दोन लाख रक्तपिशव्या जमवण्याचा प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी संकल्प केला आहे.

जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. हे शिबीर क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत पाचोरा येथील नवकार प्लाझा येथे करण्यात आले. पन्नासपेक्षा अधिक रक्तदात्यांनी या शिबीरात दातृत्व दाखवले. कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भालेराव, तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, जिल्हा अल्पसंख्यक उपाध्यक्ष इरफान मनियार, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे यांनी देखील रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले. भविष्यात केव्हाही या दात्यांना रक्ताची गरज भासल्यास ते मोफत मिळणार आहे.

रक्तातील नात्यातील लोकांकडून अर्धे पैसे घेतले जाईल. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा महीला उपाध्यक्षा संगिता नेवे, महीला तालुका अध्यक्षा कुसुम पाटील, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, रेडप्लस ब्लडबँकचे डॉ. भरत गायकवाड, अमोल शेलार, दिपक पाटील, रविंद्र पाटील, अमोल पाटील आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment