महाराष्ट्रातील निर्बंधांना पुढील महिन्यात मुदतवाढ?

On: April 18, 2021 11:33 AM

मुंबई : एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र या निर्बंधांना अजून मुदतवाढ मिळणार असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत.

राज्य शासन कोरोना परिस्थीतीचा आढावा घेत आहे. या निर्बंधांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी व काही घटना देखील पुढे येत आहेत. परस्थितीचा अंदाज घेऊन या निर्बंधांना मुदतवाढ दिली जाण्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. सुरु असलेल्या निर्बंधांचा व परिस्थीतीचा अंदाज घेऊनच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे देखील टोपे यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment