नाशिक डीआयजी पथकाच्या कारवाईत गावठी कट्टा हस्तगत

जळगाव : पोलिस महानिरिक्षक नाशिक परिक्षेत्र व चोपडा ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आज गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला. या कारवाईत कट्टा विकत घेणा-यासह तिस हजार रुपये किमतीचा कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. मो.वसीम सुलतान शेख (22),रा.साईबाबा मदिराजवळ, जिजामाता नगर भोसले मार्ग अहिल्याबाई चाळ अण्णा भाऊ साठे नगर रुम नं.1277 मानखुर्द शिवाजी नगर मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कट्टा विकणारा गुरुदेवसिंग उर्फ खटका लिवरसींग बडोल रा.पार उमर्टी ता.वरला जि.बडवाणी (मध्यप्रदेश) हा फरार होण्यात यशस्वी झाला असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहे.

अटकेतील आरोपीस चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. नाशिक परिक्षेत्र विभाग पथकातील कारवाईत पोलिस निरिक्षक बापू रोहम, स.पो.नि. सचिन जाधव, स.पो.नि. बशिर तडवी, हे.कॉ. रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, पोलिस नाईक मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मंडलीक, राकेश पाटील तसेच चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. देवीदास कुनगर यांच्यासह पोलिस नाईक रितेश चौधरी, किरण पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील दोघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला आर्म अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here