विनोद पाटील यांची कुलसचिवपदावरील नियुक्ती रद्द व्हावी – गुप्ता यांची मागणी

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलसचिवपदी विनोद पाटील यांची झालेली नियुक्ती रद्द होण्याची मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कुलगुरु वी.एल. माहेश्वरी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

30 जुलै 2022 रोजी कुलसचिव पदासाठी घेण्यात आलेल्या मुलाखती सत्रात विनोद प्रभाकर पाटील यांची नियुक्ती झाल्याचे वर्तमान पत्रातून समजल्याचे दीपककुमार गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे. जळगाव सत्र न्यायालयातील चौथे सहाय्यक दिवाणी न्यायालयात आरसीसी क्रं. 610 / 2006 नुसार विनोद पाटील यांच्याविरुद्ध दावा दाखल करण्यात आला आहे. विनोद पाटील हे प्रथमदर्शनी दोषी आढळले असून न्यायालयाने सीआरपीसी 319 नुसार त्यांना आरोपी केले आहे. त्यांना मुळ पदावर बोलावून विद्यापीठाकडून कोणत्याही प्रकारचे फायदे देण्यात येवू नये असे न्यायालयाने म्हटले आहे.

विनोद पाटील यांच्याविरुद्ध समन्स काढण्यात आले त्यांनी परीक्षा विभागात अफरातफरी करुन संगणकाचा पासवर्ड बदलून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे समजल्याचे दीपककुमार गुप्ता यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी न करता त्यांना कुलसचिवपदी नियुक्ती देण्यात आली असल्याचे गुप्ता यांनी कुलगुरु आणि राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

विनोद पाटील यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये इंजीनियरिंग विभागातील मेकॅनिकल ब्रँचच्या सुमारे 200 ते 250 विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण केल्याचा आरोप आहे. याबाबत समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीने दिलेला अहवाल कुलगुरुंना दाखवण्यात आला नसून तो दडपण्यात आल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी 25 जुलै 2022 रोजी कुलगुरुंकडे तक्रार दाखल असूनही कुलसचिवपदी विनोद पाटील यांना नियुक्ती देण्यात आल्याचे गुप्ता यांनी कुलगुरुंसह राज्यपालांना दिलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे. त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येवून त्यांची सखोल चौकशी होण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here