साखळीने बांधून आजोबांची हत्या केली नातूने ; पोलिसांनी सत्य बाहेर आणले मोठ्या शिताफीने

नाशिक : आजोबा प्रत्येक व्यक्तीचा पहिला मित्र असतो. तसेच नातू हा प्रत्येक व्यक्तीचा शेवटचा मित्र असतो. त्यासाठीच बालपण आणि वृद्धापकाळ समान असल्याचे म्हटले जाते. मात्र या घोर कलीयुगात काही लोक अतिशय निष्ठूर झाले आहेत. त्यांना नात्यागोत्याची अजिबात पर्वा नसते. नाशिक शहरातील एका नातवाने आपल्या आजोबांचे हातपाय साखळीने बांधून त्यांची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तो नातू एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच्या आजोबांचा मृतदेह चारचाकी वाहनातून नेवून एका नाल्यात फेकून दिला. या भिषण घटनेने नाशिककरांचे समाजमन ढवळून निघाले आहे.

सध्या कोरोना या विषाणूची तिव्रता कमी झाली असली तरी धोका अजुन टळलेला नाही. आपला मास्क हेच सद्यस्थितीत आपले बचावाचे साधन समजले जात आहे.
नाशिक – गिरनारे नजीक धोंडेगावात रघुनाथ श्रावण बेंडकुळे हे सत्तर वर्षाचे जेष्ठ नागरिक रहात होते. किरण गिरनारे हा त्यांचा नातू आहे. वयोवृद्ध रघुनाथ बेंडकुळे यांना सतत घरात बसून राहणे आवडत नव्हते. मात्र कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही या कारणास्तव त्यांचा नातू त्यांना अजिबात बाहेर पडू देत नव्हता.
सध्या देवालये देखील बंद आहेत. मात्र वयोवृद्ध रघुनाथ बेंडकुळे यांना मंदिरात जाण्याची अथवा घराबाहेर पडून फिरुन येण्याची इच्छा होत असे. लॉकडाऊन आता ब-याच प्रमाणात अनलॉक झालेले आहे. त्यामुळे काही प्रमाणात आजोबांना बाहेर जावू देण्यास हरकत नव्हती. मात्र नातू किरण त्यांना कुठेही जावू देत नव्हता. तो त्यांना शारिरीक व मानसिक त्रास देत होता. तो त्यांना साखळीने घरात बांधून ठेवत होता

ज्याप्रमाणे एखादा संशयीत आरोपी पळून जावू नये म्हणून त्याला सुरक्षेच्या कारणास्तव नजरकैदेत ठेवले जाते अगदी त्याप्रमाणे किरण आपल्या आजोबांना नजर कैदेत साखळीने बांधून ठेवत होता. ज्या नातवाला आपण अंगा खांदयावर खेळवले तो नातू आपल्याला साखळीने बांधून ठेवत असल्यामुळे आजोबांना मनातल्या मनात अपार दुख: होत असे. आपला नातूच आपले स्वातंत्र हिरावून घेत असल्याचे शल्य त्यांच्या मनाला बोचत होते.

एके दिवशी साखळी बांधली नसल्याचे बघून संधी साधून आजोबांनी थेट पोलिस स्टेशन गाठले. त्यांनी आपल्या नातवाची तक्रार पोलिसात केली. वयोवृद्ध आजोबांना साखळीने बांधून ठेवले जात असल्याचे समजताच पोलिस देखील गहिवरले. त्यांनी नातू किरण यास बोलावून खडे बोल सुनावले.

आजोबा रघुनाथ यांनी आपली पोलिसात तक्रार केल्याचा राग किरणच्या मनात घर करुन बसला. त्याने आपल्या आजोबांच्या तोंडाला चिकटपट्टी बांधून त्यांचा खुन केला. खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह चारचाकीने शहराच्या ओढा शिवारातील नाल्यात फेकून दिला.

दुस-या दिवशी सकाळी ओढाच्या नाल्यात एका वृध्द इसमाचा मृतदेह परिसरातील नागरिकांना आढळून आला. एका सुज्ञ नागरिकाने हा प्रकार आडगाव पोलिसांना कळवला. माहिती मिळताच आडगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक इरफान खान यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, हवालदार सुरेश नरवाडे, दशरथ पागी, गणपत ढिकले, देविदास गायकवाड यांच्यासह घटनास्थळ गाठले.

नागरिकांच्या मदतीने त्यांनी पाण्यातील मृतदेह बाहे काढला. हा नक्कीच घातपाताचा प्रकार असल्याचा अचुक अंदाज पोलिस पथकाला आला होता. त्या दृष्टीने तपास सुरु करण्यात आला. त्यात पोलिसांच्या प्रयत्नाला यश देखील आले. वयोवृद्ध मयत रघुनाथ बेंडकुळे हे सर्वांच्या दृष्टीने अनोळखी होते.

या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध आडगाव पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेहाचा फोटो काढून तो परिसरात व्हायरल करत ओळख पटवण्याचे काम सुरु करण्यात आले. एका जागरुक नागरिकाने तो फोटो बघून लागलीच शंका व्यक्त केली की फोटोतील मयत इसम हा धोंडेगाव येथील असून त्यांचा त्यांच्या नातवानेच खून केला असावा.

या एवढ्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरिक्षक इरफान खान यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली.
पोलिस पथकाने संशयित नातू तथा आरोपी किरण याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा किरण बेंडकुळे नंतर पोलिसी खाक्या बघून सरळ उत्तरे देवू लागला.

आपल्या आजोबांचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. किरणविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्याने गुन्ह्यात वापरलेली ओमनी गाडीसह त्याला अटक करण्यात आली.

गिरणारे नजीक धोंडेगावातील रहिवासी जेष्ठ नागरीक रघुनाथ श्रावण बेंडकुळे (70) यांचा त्यांचा नातू किरण याने निर्घृणपणे खून केल्याचे उघडकीस आले. आजोबा वृद्ध असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे कारण पुढे करुन नातू किरण हा त्याच्या आजोबांना सांगून घराबाहेर अथवा मंदिरात जावू देत नव्हता. तो त्यांना साखळीने घरात बांधून ठेवत होता.

नातवाच्या त्रासाला वैतागून आजोबा रघुनाथ बेंडकुळे यांनी मृत्यूपुर्वी साधारण एक महिन्यापुर्वी हरसुल पोलिस स्टेशनला धाव घेत नातवाची तक्रार देखील केली होती. त्या रागाच्या भरात रविवारच्या रात्री आजोबा रघुनाथ घराबाहेर झोपलेले होते. त्यावेळी त्याने त्यांच्या तोंडाला घट्ट चिकट पट्टी लावून, हातापायाला लोखंडी साखळी बांधून त्यांना मारुती ओमनी या वाहनात टाकून धोंडेगाव मार्गे मखमलाबाद येथून आडगाव शिवारातील ओढा गावातील नाल्याजवळ त्यांना आणले. दरम्यान रघुनाथ बेंडकुळे हे मयत झाले होते. त्यांचा मृतदेह त्याने नाल्यात फेकून देत तेथून पलायन केले.

दुसऱ्या दिवशी ओढाच्या नाल्यात हा मृतदेह आढळून आला व घटनेला वाचा फुटली. त्यानंतर पोलिस पथकाने तपास पुर्ण केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here