आगग्रस्त कुटूंबास एक हजाराची मदत

On: March 25, 2021 11:40 AM

जळगाव : जामनेर तालुक्यातील मोरगाव तांडा येथे काही दिवसांपुर्वी समाधान बाबुलाल चव्हाण यांच्या घराला मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत समाधान चव्हाण यांच्या यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू, कपडे व धान्य जळून खाक झाले. याप्रसंगी विनोद आलम चव्हाण यांनी या कुटूंबाला मदतीचा हात देण्यासाठी धाव घेतली. ग्रामपंचायत शिपाई असलेल्या विनोद आलम चव्हाण यांनी आगग्रस्त समाधान बाबुलाल चव्हाण यांना एक हजार रुपयांची मदत केली आहे. विनोद चव्हाण यांच्या या मदतीने आगग्रस्त कुटूंबास मदतीचा हात लागला असून समाधान व्यक्त केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment